राज्यातील ३५ महिला-पुरुष ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित

15 Oct 2025 17:23:35
वर्धा, 
gram-geetacharya-title : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्रीगुरुदेव ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्यावतीने सन २०२५-२०२६ या वर्षात घेतलेल्या ग्रामगीताचार्य या परीक्षेत पदवी प्राप्त करणार्‍या ३५ महिला व पुरुषांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात ‘ग्रामगीताचार्य’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुष गटातून भद्रावती येथील ओमप्रकाश पांडे, महिला गटातून गोंदिया येथील रुपाली तरोणे यांना प्रथम क्रमांक मिळाला.
 
 
WARDHA
 
 
 
अध्यक्षस्थानी संचालक मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा बोंडे होत्या. उद्घाटक म्हणून सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक मंडळाचे सुरेंद्र भुयार, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, डॉ. ताराचंद कंठाळे, काशिनाथ फुटाणे, रामदास सदार, रामदास देशमुख, महादेव राघोर्ते, पौर्णिमा सवाई, विजया दहेकर, शोभा कऊटकर, आरोग्य विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम पाळेकर, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, निलेश गावंडे, बाबाराव पाटील, विलास साबळे यांची उपस्थिती होती.
 
 
याप्रसंगी जितेंद्र पातोडे, ममता डोलारे, उमराव डोलारे (गोंदिया), गजानन काकडे (धोत्रा), संगीता कोरडे (मोहपार), सोनाली गावंडे (भद्रावती), समीक्षा कलोडे (नागपूर), संगीता घासले (गोरेगाव), विनोद केळझरकर (कारंजा), वेणू पन्नासे (गुरुदेवनगर), रजनी तरोणे (गोंदिया), डॉ. कृतिका पेठे (आष्टी), गजानन कवाणे (पुसद), दत्तात्रय मार्कंड (आर्णी), तारेंद्र ठाकरे (कवलेवाडा), वासुदेव बारंगे (उमरी), सुनीता तारेकर (भोंदेवाडा), निळकंठ सूर्यवंशी (तळोणी), कमला डांगरे (वरोरा), कोमल भिसे (जानाटोला), पल्लवी दुमणे (सिंधी मेघे), नमिता तिखे (तळेगाव), डॉ. संजय पाटील (वाशिम), विक्रम मोहोड (जालनापूर), मिनल पवार (चांदूररेल्वे), निता बोडे (वरोरा), अशोक कोसरे (चंद्रपूर), शुभांगी डेहणकर (चांदूररेल्वे), चंदा चिखले (वडोदा), दीपाली गिरी (बोरगाव), मनोहर पारोधे (वरोरा), प्रियंका गरडे (पुसद), प्रवीण बुले (सौंसर) आदी ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
 
पदवीदान समारंभाला पुष्पा बोंडे, पौर्णिमा सवाई, ताराचंद कंठाळे, निलेश गावंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाब खवसे यांनी केले. संचालन गोपाल कडू आणि आभार प्रदर्शन विठ्ठल उमप यांनी केले.
Powered By Sangraha 9.0