अमरसृष्टीतील ‘दानवीर कर्ण पंकज धीर' यांचे निधन

15 Oct 2025 13:11:24
मुंबई,
Pankaj Dheer मनोरंजन विश्वावर आज पहाटेच एक धक्का देणारी दु:खद बातमी आली आहे. बीआर चोपडांच्या महान महाकाव्य ‘महाभारत’ मधील दानवीर कर्ण या अविस्मरणीय भूमिकेसाठी घराघरांत ओळखले जाणारे दिग्गज अभिनेता पंकज धीर यांचे १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी अखेर पंकज धीर यांनी शेवटचा श्वास घेतला.
 
 

Pankaj Dheer death, Mahabharat actor 
काही दिवसांपासून ते कॅन्सरशी लढत होते आणि दुर्दैवाने ही लढाई त्यांनी जिंकू शकली नाही. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या असामान्य अभिनय आणि दमदार आवाजामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.
१९८८ मध्ये Pankaj Dheer प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मालिकेत ‘महाभारत’ मध्ये त्यांनी साकारलेला कर्णचा पात्र आजही लाखो लोकांच्या आठवणीत जिवंत आहे. त्यांच्या अभिनयामुळे ते अमर झाले असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अनेक भागांमध्ये तर त्यांच्या मूर्तींचीही पूजा केली जाते. पंकज धीर यांनी ‘सड़क’, ‘सोल्जर’, ‘बादशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्येही अभिनय करून आपली छाप सोडली आहे. तसेच, ते टेलिव्हिजनवरही सक्रिय होते आणि अनेक मालिकांतून प्रेक्षकांचा मन जिंकले.त्यांच्या निधनानंतर मुंबईच्या विलेपार्ले येथील पवनहंस श्मशान घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चित्रसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना अंतिम सलाम देण्यासाठी श्मशान घाटावर उपस्थित राहणार आहेत.पंकज धीर यांचे वयाप्रमाणेच त्यांच्या नात्यातील कलाकारांची पिढीही कलेत सक्रिय आहे. त्यांचा मुलगा निकितिन धीर हा प्रसिद्ध अभिनेता असून ‘जोधा अकबर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ यांसारख्या चित्रपटांत कामगिरी करून नामार्जन केले आहे. निकितिनची पत्नी कृतिका सेंगर हीही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जी मुख्यत्वे टेलिव्हिजनवर सक्रिय आहे.पंकज धीर यांचे निधन म्हणजे भारतीय दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीतील एक युगाचा शेवट आहे. ते ‘दानवीर कर्ण’ या त्यांच्या महान भूमिकेमुळे सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक अमोघ हानी आहे.
Powered By Sangraha 9.0