प्रभाकर डोंगरे यांची शतकी वाटचाल

15 Oct 2025 19:41:47
नागपूर,
Prabhakar Dongre प्रभाकर डोंगरे यांचा जन्म १९२७ मध्ये बैतुल येथे झाला. त्यांचे  १० वी पर्यंत शिक्षण बैतुलमध्ये झाले. १९४५ मध्ये त्यांनी नागपूरला येवून बंगाल नागपूर रेल्वे (बिएनआर) मध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९४९ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सत्‍याग्रहात सहभागी झाले.  तीन महिन्यांसाठी कारावासात गेले. शिक्षक म्हणून डी.डी. नगर विद्यालयात रुजू झाल्यानंतर, १९५५ मध्ये ते एनसीसी (एयर विंग) मध्ये सामील झाले. १९७७ मध्ये ते महाराष्ट्र एयर स्काड्न. एनसीसी म्हणून निवृत्त झाले. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी बीए, बीएड केले आणि १९८७ मध्ये शाळेतून निवृत्त झाले.
 
Prabhakar Dongre
 
डोंगरे यांना तीन मुले आहेत - प्रशांत, प्रमोद, विनोद. आजही ते रोज सकाळी फिरायला जातात आणि घराच्या आजूबाजूला वृक्षारोपण करणे व संगोपन करणे यामध्ये सक्रिय आहेत. त्यांचे जीवन हे आई-वडिलांचे संस्कार आणि समाज प्रबोधनाचे कार्य यांचे उत्तम उदाहरण आहे. Prabhakar Dongre तरूण पिढीला उत्साहीत व कार्यान्वित करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
 
सौजन्य:अजय देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0