प्रेमानंद महाराजांसाठी 'अल्ला'कडे 'दुआ'

15 Oct 2025 14:26:57
अयोध्या,
Prayer for Premanand Maharaj मथुरा-वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आजारी असल्याच्या बातमीनंतर विविध समुदायांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील मुस्लिम जोडप्याने त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. इक्बाल अन्सारी आणि त्यांच्या पत्नी मुन्नी बेगम यांनी अल्लाहकडे महाराज लवकर बरे होण्यासाठी दुआ केली आणि त्यांच्या दीर्घायुष्याची इच्छा व्यक्त केली.
 
 

dffhfgh
 
प्रेमानंद महाराजांचे प्रवचन आजही देश-विदेशातील अनेक लोक, विशेषतः तरुण वर्ग आवडीने ऐकतो आणि सोशल मीडियावर शेअर करतो. त्यामुळे अनुयायांमध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. इक्बाल अन्सारी यांनी म्हटले की, प्रेमानंद महाराजांचे मार्गदर्शन आणि शिकवणी समाजासाठी अमूल्य आहे, आणि महाराज लवकर बरे होऊन भक्तांकडे परत यावेत अशी त्यांची प्रार्थना आहे. मुन्नी बेगम यांनीही अल्लाहकडे महाराजांसाठी दुआ केली आणि आशा व्यक्त केली की लवकरच ते निरोगी होतील आणि भक्तांकडे परत येतीत असे म्हंटले आहे.
Powered By Sangraha 9.0