विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

15 Oct 2025 19:59:58
आर्वी, 
protest-in-arvi प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रकल्पग्रस्तांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार उईके यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
 
 
protest-in-arvi
 
निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आली नाही. protest-in-arvi शासन नोकरी देण्यास असमर्थ असेल तर नोकरीला पर्याय म्हणून ५० लाख रुपये मोबदला देऊन नोकरीचा हक वळता करून घ्यावा, ४५ वर्ष पार केलेल्या प्रकल्पग्रस्त धारकांना नोकरीला पर्याय केलेल्या मागणीला अनुसरून केलेल्या मागणीला ५० लाख रुपये मोबदला प्रदान करण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र हस्तांतरण प्रमाणपत्र धारकांच्या स्वत:च्या शपथपत्रावर करण्यात यावे, प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला सरसकट प्रदान करण्यात यावा, तालुयातील प्रकल्पग्रस्तांच्या १८ नागरिक सोई सुविधा जशास-तश्या अवस्थेत पडल्या असल्याने त्या निकाली काढण्यात याव्या, तुकडे बंदीचा जीआर लवकरात लवकर काढण्यात यावा, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांनी निवेदनातून केल्या आहेत.
निवेदन आ. दादाराव केचे दिले. शासकीय पातळीवर मागण्यांचा पाठपुरावा करून मागण्या पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन दिले. protest-in-arvi  आ. सुमित वानखडे यांनी सुद्धा प्रकल्पग्रस्तांना हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन आपल्या मागण्या निकाली काढू, असे आश्वासन दिले. आंदोलनस्थळी शैलेश अग्रवाल, धर्मेंद्र राऊत, राजेश शिरगरे, संघदीप नाखले, सचिन दहाट, कैलास कापसे, रवींद्र खंडारे, सूर्यप्रकाश भट्टड, सुहास ठाकरे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रवीण कडू, पांडुरंग मलिये, शैलेश तलवारे, वसंत मांडवे, हर्षल शेंडे, दिनेश देहंकर, राजेंद्र निघोट, आशिष बुरघाटे, सिद्धार्थ मनोहर, मोरेश्वर पिंगळे, रजाक अली, आदींचा सहभाग होता.
Powered By Sangraha 9.0