महाराष्ट्रात परतीचा मान्सून सक्रिय...वादळी पावसाची शक्यता

15 Oct 2025 11:43:53
मुंबई,
Return monsoon active in Maharashtra महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरु झाला असून हवामान विभागाने राज्यभरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात १७ ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण व गोवा भागातही पावसाला अनुकूल वातावरण आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभरात सक्रिय राहील, ज्यामुळे ठिकठिकाणी पावसाची तीव्रता जाणवेल. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या माहितीप्रमाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, नंतर हळूहळू किमान तापमान दोन-तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
 
 

Return monsoon active in Maharashtra 
 
 
१६ ऑक्टोबरसाठी रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये देखील पावसाची अपेक्षा आहे. १७ ऑक्टोबरसाठी पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. Return monsoon active in Maharashtra मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळकोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या परतीचा मान्सून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा ओलांडून कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यात प्रवेश करत आहे. आजची मान्सून सीमा कारवार, कलबुर्गी, निझामाबाद, कांकर, सागर, आयलंड आणि गुवाहटी शहरांमधून जात आहे. देशाच्या परतीच्या क्षेत्रातील सुमारे ८५ टक्के भागात मान्सून परतलेला आहे.
राज्यातील विविध भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, तर रायगड आणि ठाणे भागात हलक्या पावसाची अपेक्षा आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर केला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार १६ ऑक्टोबरला राज्यभरात पावसाचा जोर वाढेल, त्यानंतर हळूहळू पावसाची तीव्रता कमी होईल.
Powered By Sangraha 9.0