विडूळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन व शस्त्रपूजन

15 Oct 2025 20:04:11
विडूळ :
RSS Vidul राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विडूळ मंडळाच्या वतीने पथसंचलन व शस्त्रपूजनाचा कार्यक्रम मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते संघाचे विदर्भ प्रांत सहप्रचारक परिक्षित जावडे यांनी संघस्थापनेपासून शंभर वर्षांचा इतिहास उलगडून सांगितला. यावेळी त्यांनी शताब्दी वर्षानिमित्त संघाकडून दिशानर्देश असलेली पंचसूत्रीसुद्धा उपस्थितांना समजावून या कार्यक्रमात गावातील सर्व शाखांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. संध्याकाळी ५ वाजता पथसंचलनास प्रारंभ झाला. गावातील मुख्य मार्गाने संचलन करत गणवेशधारी स्वयंसेवकांनी जयघोषासह शिस्तबद्ध पथसंचलन केले.
 
 
vidul
 
RSS Vidul  कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले. संघाचे विदर्भ प्रांत सहप्रचारक परिक्षित जावडे, उमरखेड खंड संघचालक संजय फटाले व सुरेश आलमे यांच्या हस्ते झाले. सोहळ्याला विडूळ येथील उत्साही आणि अनुशासित स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यातील उपस्थितीमुळे समाजात एकात्मतेचा संदेश देण्यात आला. गावातील विविध शाखांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे संचालन कुणाल आकोसकर, प्रास्तविक यश दुर्केवार, अतिथी स्वागत किरण संगेवार, व्यासपीठ परिचय राहुल मामीडवार, संघगीत संजय इंगळे, तर आभारप्रदर्शन कटके यांनी केले. शाखेतील नियमित पथसंचलन, समाजातील बांधिलकी, योगसाधना, शिस्तप्रियता, देशासाठी निष्ठा यांचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0