शेतकर्‍यांसाठी मदतफेरी काढून मुख्यमंत्री निधीला मदत

15 Oct 2025 19:40:06
वणी, 
Setakary madat pheri तालुक्यातील चिखलगाव येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ, साईदर्पण ग्रुप व जगन्नाथबाबा योग ग्रुप यांच्या वतीने घरोघरी मदतफेरी काढून जनतेला नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन केले. त्याला येथील नागरिकांनी सढळ हाताने मदत करून ५८ हजार ७०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविले आहेत.
 
 
madat
 
यावर्षी अतिवृष्टी व महापुराने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सहानुभूतीने विचार करून चिखलगाव परिसरातील शेतकरीनगर, ओमनगर, मंगलम् पार्क या भागात राहणार्‍या जनतेने निधीसाठी सढळ हाताने मदत केली आहे. Setakary madat pheri मदतफेरीच्या माध्यमातून निधी गोळा करण्यासाठी आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ चिखलगावचे अध्यक्ष सुधाकर गारघाटे, रमेश सुंकुरवार, लक्षमण ईद्दे, दिगंबर गोहोकार, अरुण झाडे, जयप्रकाश राजुरकर, उपरे, नेताजी मोरे, परशराम ढुमणे, संजय पोटदुखे, सुधीर ठेंगणे, दिगंबर मुजोरिया, नरेंद्र धोबे, सारनाथ सोनटक्के, नामदेव धुळे, दिनेश श्रीवास्तव, भाऊ कोटनाके, विठ्ठल वैद्य, सुरेश रायपुरे, विठ्ठल होले, विजय गौरकार, देशमुख यांनी सहकार्य केले. मदतफेरीच्या माध्यमातून भरभरून निधी संकलन करून बाधित शेतकर्‍यांना मोठी मदत केल्याबद्दल वणी परिसरातून संबंधितांचे अभिनंदन व करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0