वर्धा,
Shirdi incarnates in Wardha शिर्डीतील साईबाबांच्या मूळ पादुका आज वर्दीतील साई मंदिरात पोहोचल्या आहेत. वंजारी चौकातून साई मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रेत अश्व भजनी दिंड्या, लेझीम मंगल वाद्यसह पादुका साई मंदिरात आणण्यात आल्या. रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. पादुकासोबत शिर्डी साई संस्थाचे मुख्य गुरुजी तसेच २१ जणांचा ताफा आहे. साई मंदिरात रात्री १० वाजेपर्यंत साईबाबांच्या मूळ पादुका दर्शनाला राहणार आहेत. या पादुकाचा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन साई मंदिरचे सचिव सुभाष राठी यांनी केले आहे. दुपारी १२ वाजता मध्यांनआरती शिर्डीच्या साई मंदिरात करण्यात येथे त्या पद्धतीने करण्यात आली.