विभागीय टेबल टेनिस सामने
पुसद,
Table Tennis Matches माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये विभागीय शालेय सामने उत्साहात पार पडले. यामध्ये १४ वर्षे वयोगटात माउंट लिटेरा झी स्कूलचे विद्यार्थी पार्थ पवार, इशांत चांडक, अर्णव पाटील, ओम राठोड आणि सर्वेश लांडे या खेळाडूंनी विजयाची परंपरा राखत अंतिम सामन्यात अमरावती संघाचा एकतर्फी पराभव करून विजय मिळवून सामन्यात अजिंक्य बहुमान प्राप्त केला. परभणीत होणार्या शालेय राज्यस्तर सामन्याकरिता आपली निवड सार्थ ठरवली.
Table Tennis Matches याच सामन्यात वर्षे १७ वयोगटात या शाळेची विद्यार्थिनी अक्षरा भागवत चिद्दरवार हिने आपल्या गटात अव्वल राहून राज्यस्तर निवड चाचणीकरिता आपली निवड सार्थ ठरवली. वर्षे १९ वयोगटामध्ये स्कूलचे विद्यार्थी श्रीकुंज क्षीरसागर व अर्णव खापरे यांनी आपली निवड सार्थ सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे प्रशिक्षक अविनाश देशपांडे व प्रसाद देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.