विजय चोरडिया यांचा शिवसेनेत प्रवेश

15 Oct 2025 12:00:13
तभा वृत्तसेवा
वणी,
vijay-chordia : भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विजय चोरडिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आहे. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या उपस्थितीत विजय चोरडिया यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
 
 
 
y14Oct-Chordiya
 
 
 
येथील सराफा व्यवसायी व समाजसेवी विजय चोरडिया हे भाजपा राज्य कार्यकारिणीचे माजी सदस्य तसेच यवतमाळ जिल्हा भाजपाचे निमंत्रित सदस्य होते. मागील विधानसभा निवडणुकांपासून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व विजय चोरडिया यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता.
 
 
मध्यंतरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांना मिठाई भरवून दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांच्या मनातल्या गाठी काही खुलल्या नाहीत. येणाèया निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय चोरडिया यांनी घेतलेल्या या निर्णयाची शहरात जोरदार चर्चा आहे.
 
 
काँग्रेस सोडून भाजपा आणि आता शिवसैनिक झालेले विजय चोरडिया हे शिवसेनेला वणी विधानसभा मतदारसंघात कितपत उभारी देतात, हे येणाèया निवडणुकांत समोर येईल. विशेष म्हणजे, विजय चोरडिया यांचे सुपुत्र अ‍ॅड. कुणाल चोरडिया हे भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0