खराब रस्त्यामुळे स्कूल व्हॅन अनियंत्रित, रस्त्याच्या कडेला पलटली

16 Oct 2025 16:17:24
भंडारा, 
bhandara-school-van-accident शाळेतून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन खराब रस्ते आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्याच्या बाजूला पलटल्याने सहा ते सात विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.
 
 
bhandara-school-van-accident
 
जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा सर्वश्रुत आहे. bhandara-school-van-accident रस्त्यांची डागडुजी केली जावी यासाठी कायम लोकांची ओरड असते. परंतु प्रशासनाकडून हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. याचा परिणाम आज शाळेच्या विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागला. कारधा येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांना घेऊन मारोती ओमनी व्हॅन भंडारा तालुक्यातील मांडवी,.माटोरा, खमारी येथील विद्यार्थी सोडवण्यासाठी भिलेवाडा सूरेवाडा मार्गाने जात होती. दरम्यान या मार्गावर असलेल्या पुलाजवळ रस्ता आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली. यात गाडीतील अवेंद्र भोयर, सानिध्या चोपकर, उर्वेश बेदरकर, सानवी बेदरकर, रुद्रानी बेदरकर, गर्ग मेश्राम मेश्राम व गाडीचा चालक उमेश मेश्राम जखमी झाले. घटनेनंतर रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी मदतीला धावून जात विद्यार्थ्यांना गाडी बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र पुन्हा एकदा खराब रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले.
Powered By Sangraha 9.0