प्रियकराकडून प्रेयसीचा गळा आवळून खून

16 Oct 2025 20:53:28
चांदूर रेल्वे,
boyfriend-kill-girlfriend प्रेम, विश्वास, नातं आणि भावना या सगळ्यांचा एकाच क्षणात केलेला निर्दयी अंत! चांदूर रेल्वे शहरातील डांगरीपुरा परिसरात घडलेली ही हृदयद्रावक घटना ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा आवरून खून केला आणि तिचा मृतदेह रेल्वे पुलाजवळ फेकून दिला.
 
 
boyfriend-kill-girlfriend
 
सदर प्रकरणी शुभम विठ्ठलराव हटवार (वय २८, रा. डांगरीपुरा, चांदूर रेल्वे) याला पोलिसांनी अटक केली आहे. शुभमचे त्याच्या प्रेयशींची अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, तीचे लग्न झाले. पण, पतीच्या व्यसनाधीनतेमुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे ती माहेरी चांदूर रेल्वेला परत आली. तिच्या आयुष्यात एका लहान मुलीचाही जन्म झाला होता. boyfriend-kill-girlfriend दुसरीकडे शुभमचेही लग्न झाले होते. तरीही दोघांचे जुने नाते पुन्हा प्रस्थापित झाले. पूजाने शुभमवर लग्नाचा तगादा लावायला सुरुवात केली. शुभम या मानसिक तणावाने त्रस्त होत गेला आणि याच तणावाने अखेर एका निष्पाप जीवाचा बळी घेतला. १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री शुभमने पूजाला आपल्या घरी बोलावले. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर शुभमने तिचा गळा आवरून निर्दयपणे खून केला. मृतदेह लपवण्यासाठी त्याने पूजाचे प्रेत स्थानिक स्मशानभूमीजवळील रेल्वे पुलाजवळ पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान नेऊन ठेवले. त्यानंतर रेल्वे गेल्याने तिच्या शरीराचे तुकडे झाले. सकाळी घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली. पूजा सकाळपासून घरी न आल्याने तिचा भावाने चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्याला बहिणीचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याचे समजले. परंतु, पोलिसांच्या तांत्रिक तपासानंतर खर्‍या घटनेचे धागेदोरे सापडले. आरोपी शुभमला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असता, त्याने कबुली दिली की, पूजाने वारंवार लग्नासाठी दबाव आणल्यामुळे त्याने खून केल्याचे सांगितले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0