जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

16 Oct 2025 17:34:56
मालेगाव, 
casteist-abuse-beating : तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात जुन्या वादामुळे एक महिला आणि तिच्या मुलासोबत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून ११ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
jkj
 
 
 
याप्रकरणात सिंधु जनार्धन काशींदे (वय ४५) रा. डोंगरकिन्ही यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या मुलगा वैभवसह शेतातून घरी परत जात असताना राजू वसंता आडे याने जातीवाचक शिवीगाळ करीत वैभववर लाठीने हल्ला केला. यानंतर इतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून दोघांना मारहाण केली. याप्रकरणात दाखल तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारावर मालेगाव पोलिस ठाण्यात राजू आडे, वसंता आडे, प्रविण आडे, निलेश आडे, पंडित आडे, देवकाबाई आडे, अर्चना आडे, अजय आडे, मीराबाई आडे, मनोज आडे आणि रितेश आडे या ११ आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणात प्राथमिक चौकशीनंतर पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0