कुरकुरीत खमंग चकलीची भाजणी

16 Oct 2025 14:52:06
chakli खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की अनारसे, लाडू, चिवडा, शेव, करंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली ही सर्वांची अगदी खूप आवडती असते. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या.
 
 

चकली  
 
 
 
साहित्य 
1 किलो चकली भाजणीसाठी
  • 500 ग्रॅम तांदूळ
  • 250 ग्रॅम चणा डाळ
  • 125 ग्रॅम उडीद डाळ
  • 125 ग्रॅम मुगडाळ
  • 30 ग्रॅम पोहे
  • 30 ग्रॅम साबुदाणा
  • 30 ग्रॅम धणे
  • 30 ग्रॅम जीरे
 
सर्व साहित्य प्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून घ्यावे.त्यानंतर सर्व साहित्य पंख्याखाली किंवा घरातच वाळवावे. त्यानंतर एक एक जिन्नस वेगवेगळे चांगले खमंग भाजून घ्यावे. पोहे व साबुदाणे देखील भाजून घ्यावेत. जीरे धणे ही भाजून घ्यावेत. धने जीरे यामुळे चकलीला मस्त खमंगपणा येतो.chakli सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.
दळून आणलेल्या भाजणीत तिखट,तीळ,ओवा, मोहन घालून गोळा बनवावा व चकल्या पाडाव्यात व खमंग टाळून घ्यावा
Powered By Sangraha 9.0