लक्ष्मीपूजनाला समृद्धीसाठी करा कवड्यांचे टोटके

16 Oct 2025 17:36:37
Kavadi tricks for Lakshmi Puja लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर छोट्या कवड्यांची विधीवत पूजा करून आर्थिक स्थिरता आणि समृद्धी आणण्याचा प्राचीन परंपरेतून आलेला उपाय पुन्हा चर्चेत आला आहे. या वर्षी लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी केलेले कावडींचे विशेष पूजन शुभ मानले जाते. पुराणकथांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी आणि कवड्यांच्या उदय झाला, त्यामुळे कवडीला म्हणजे धन आणि संपत्तीचे प्रतीक मनाली जाते.
 
 

Kavadi tricks for Lakshmi Puja 
 
दिवाळीच्या रात्री, विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ७, ११ किंवा २१ कवड्यांचा उपयोग केल्यास आर्थिक स्थिरता आणि व्यावसायिक नफा प्राप्त होतो, असे मानले जाते. ७ पिवळ्या कवड्यांचा उपाय करण्यासाठी त्या हळद, कुंकू आणि गंगाजलाने शुद्ध करून, "श्री श्री महालक्ष्म्यै नम:" हा मंत्र १०८ वेळा जप करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवण्याचा सल्ला पुराणांमध्ये दिला आहे. असे केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती स्थिर होते, असे समजते.
त्याचप्रमाणे, लक्ष्मीपूजनानंतर ११ कवड्या आणि पांढरे तांदूळ चांदीच्या भांड्यात ठेवून सकाळी उत्तर दिशेला ठेवल्यास संपत्तीचे नवे मार्ग उघडतात, असेही मानले जाते. २१ कवड्यांचा उपाय करताना गुलाबजल आणि दुधाने अभिषेक करून "ओम ह्रीम श्रीं क्लीम महालक्ष्म्यै नमः" हा मंत्र १०८ वेळा जप करावा. नंतर हे कवच घराच्या चारही कोपऱ्यात ठेवावे, ज्यामुळे देवी लक्ष्मीची कायमस्वरूपी उपस्थिती राहते, कुटुंबात समृद्धी व सौहार्द वाढते, असे पुराणिक विश्वास आहे.
व्यवसाय किंवा नोकरीसाठीही विशेष उपाय आहेत. पाच पिवळ्या कवड्या हळद आणि गुळात बांधून दुकानात किंवा ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवणे धन संचित करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी प्रभावी मानले जाते.
 
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी. 
Powered By Sangraha 9.0