आपण सर्व एक हाच राष्ट्रीयत्वाचा भाव : अतुल शेंडे

16 Oct 2025 20:28:30
हिंगणघाट, 
atul-shende संघाच्या शतकीय प्रवासात भारतीय समाजाची समाजाची साथ संघाला मिळाली नसती तर प्रत्येक पावली आव्हानांनी भरलेला हा प्रवास संघ इथपर्यंत यशस्वीरीत्या करु शकला नसता. त्यामुळे संघ आणि समाज हे भिन्न भिन्न नसून हिंदुत्वाच्या संरक्षण व संवर्धनात परस्पर पुरक व सहाय्यक आहेत. भारताच्या मातीतला येथील नागरिकांच्या रक्ता रक्तात भिनलेला हम सब एक हैं हा संस्कार भाव हेच भारताच्या राष्ट्रियत्वाचे एकता आणि अखंडतेचे गमक आहे असे प्रतिपादन भारतीय विचार मंचचे प्रांतीय सदस्य अतुल शेंडे यांनी केले.
 
 
atul-shende
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वायगाव (हळद्या) शाखेचा विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वता म्हणून बोलत होते. यावेळी श्री हनुमान देवस्थान पंचकमेटीचे विश्वस्त श्रावण चांभारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. atul-shende शेंडे पुढे म्हणाले की, वर्तमानात जातीयतेच्या गटागटात विखुरलेला विभाजित दिसणारा भारतीय समाज हे भारताचे मूळ समाज स्वरुप नसून हा एक भटकाव आहे. केवळ स्व बोध आत्मबोध यानेच आपण परत आपली समाजाची विस्कटलेली घडी ठिक करू असा विश्वास शेंडे यांनी व्यत केला. श्रावण चांभारे यांनी रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक तालुका संघचालक रवी गाठे यांनी केले. वंश बावणे याने अमृतवचन, प्रशांत कोटांबकर यांनी सुभाषित व हेमंत खडतकर यांच्या वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाला गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0