दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

16 Oct 2025 20:09:07
वर्धा, 
water-supply-off पिपरी मेघे व १३ गावांची पाणी पुरवठा योजनेची मुख्य नलिका २० वर्षे जुनी असून जीर्ण झालेली आहे. तसेच या लाईनवर समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पूल, हॉटेल्सचे बांधकाम झाल्यामुळे पाईप लाईन वारंवार फुटत आहे. पाईप लाईन समृद्धी व इतर महामार्गाच्या खाली आल्याने दुरुस्ती करणेही कठीण आणि वेळ घेणारी झाली. पाईप लाईन वारंवार फुटत असल्याने १४ गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असून पाच ते सात दिवसांनी पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम १६ रोजी पासून सुरू करण्यात आले असून दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मजिप्राचे कार्यकारी अभियंता प्रशांत बुरडे आणि उपअभियंता दीपक धोटे यांनी पत्रकातून दिली आहे.
 
water-supply-off
 
२० वर्षे जुन्या पाईप लाईनमधून वर्धासह १४ ग्रापंना पाणी पुरवठा केला जातो. मात्र, ही पाईप लाईन जिर्ण झाल्याने वारंवार फुटून पाणी पुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे नागरिकांना पाच ते सात दिवसाआड पुरवठा केला जातो. नागरिकांच्या समस्या लक्षात घेता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या सहकार्यामुळे गुरुवारपासून नवीन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. water-supply-off मजिप्राचे दिवसरात्र काम सुरू असून जुन्या लाइनच्या बाजूला नवीन लाइन टाकून झाली आहे. आठ ठिकाणी रस्ता ओलांडून जोडणी करायची आहे. या लाइनचा मुख्य भाग ३.५ किमी लांबीचा असून समृद्धी ते जुनापाणी पूल या जोडून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ६ किमी पैकी ३.५ किमीचा हा भाग नवीन पाईप सोबत जोडल्यास ८० टके समस्या निकाली निघणार असून नियमित तीन दिवसाआड पाणी देऊ शकणार आहे. उर्वरित भागाच्या सर्व जोडणी नोव्हेंबर मध्ये करण्याचे नियोजन आहे. गुरुवारपासून दोन दिवस नवीन लाईन जोडणीचे काम हाती घेण्यात आले असून पूर्णतः पाणी पुरवठा बंद
Powered By Sangraha 9.0