नवी दिल्ली,
10-ott-subscriptions-free-recharge रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर जाहीर केली आहे. आता वापरकर्त्यांना वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही, कारण जिओच्या एका रिचार्जमध्येच १० ओटीटी अप्सचा मोफत प्रवेश मिळणार आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या यादीत काही अशा योजना समाविष्ट केल्या आहेत, ज्या केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही तर मनोरंजनाचे केंद्र ठरणार आहेत.
जिओचा सर्वात स्वस्त असा हा प्लॅन फक्त ₹१७५ किमतीचा आहे आणि तो डेटा पॅक म्हणून उपलब्ध आहे. या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता आणि १० जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. 10-ott-subscriptions-free-recharge हा फक्त डेटा प्लॅन असल्याने यात कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे नाहीत, मात्र ओटीटी सेवांचा संपूर्ण आनंद मिळतो. या ऑफरअंतर्गत सबस्क्राइबर्सना सोनीLIV, झी५, लायनगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन एनएक्सटी, कांछा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल आणि होईचोई यांसारख्या लोकप्रिय ओटीटी अप्सचा फ्री अक्ससेस स मिळतो. वापरकर्ते हे सर्व कंटेंट थेट जिओटीव्ही मोबाइल ऍपवर पाहू शकतात.
दुसरा ४४५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनीचा हा प्लॅन त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिनची सुविधा हवी आहे. याशिवाय, पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील दिला जात आहे. 10-ott-subscriptions-free-rechargeजिओचा हा प्लॅन ग्राहकांना एकाचवेळी १० ओटीटी सेवांचा लाभ देतो, ज्यामुळे एकाच रिचार्जमध्ये मनोरंजन, संवाद आणि इंटरनेटचा संपूर्ण अनुभव मिळणार आहे. कंपनीने या रिचार्जसह काही निवडक ग्राहकांसाठी खास ऑफर्स देखील दिल्या आहेत, ज्यामुळे हा प्लॅन बाजारात आणखी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.