नागपूरला अतिरिक्त एसटी बसेस द्या; महसूलमंत्री बावनकुळेंची मागणी

17 Oct 2025 12:48:15
नागपूर,
chandrashekhar-bawankule : नागपूर जिल्ह्याला अपुर्‍या बसमुळे होणारा त्रास आणि अ‍ॅप-बेस्ड टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्याकडे नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे वेधले.
 
 
 
 
bus
 
 
 
नागपुरातील वाहतूक व्यवस्था व अपुर्‍या बसेसच्या मुद्द्यावरून महसूलमंत्री बावनकुळे यांनी परिवहन विभागातील अधिकार्‍यांवर आगपाखड करीत अतिरिक्त बसेसची मागणी केली. मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागपूरला प्राधान्याने अतिरिक्त बस देण्यात येतील, असे ठोस आश्वासन दिले.
 
 
परिवहन विभागाच्या कंट्रोलरसंदर्भातदेखील व्यक्त केली. विभागाचे कंट्रोलर फिल्डवर न राहता कार्यालयात बसून राहत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कंट्रोलर फिल्डवर असले पाहिजेत, याची जबाबदारी अधिकार्‍यांनी घ्यावी. कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाई करा, असे निर्देश दिले. याशिवाय आरटीओ कार्यालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली.
Powered By Sangraha 9.0