"आरोग्य रत्न” जीरो माईल आयकॉन अवॉर्डने डॉ. बोधनकर सन्मानित

17 Oct 2025 18:09:39
नागपूर,
Dr. Uday Bodhankar बाल आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि कॉमहॅड (COMHAD) चे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांना “आरोग्य रत्न – जीरो माईल आयकॉन अवॉर्ड 2025” सन्मान प्रदान करण्यात आला.

678 
 
हा सोहळा जीरो माईल राष्ट्रीय हिंदी साप्ताहिकच्या २० व्या वर्षानिमित्त हॉटेल तुली इंटरनॅशनल, नागपूर येथे पार पडला. अध्यक्षस्थानी रवींद्र बोराटकर तर मुख्य अतिथी माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते. Dr. Uday Bodhankar मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बोधनकर यांना आरोग्य व समाजसेवेच्या चार दशकांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.डॉ. बोधनकर यांनी COMHAD, WHO, UNICEF आणि भारत सरकारच्या सहकार्याने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांत सहभागी झालेले आहेत.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0