नागपूर,
Dynamic Pricing : दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होत आहे. शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आदी मार्गावरील सर्व रेल्वे गाडयांमध्ये नो स्पेसची स्थिती निर्माण झाली आहे. लक्ष्मीपूजन मंगळवारी असले तरी शनिवार ते गुरुवारपर्यंतच्या विमान तिकीटाचे दर सर्वाधिक झाले आहे.
मुंबई व पुण्याहून नागपूरकडे येणार्या तिकिटांचे दर वाढले आहे. पाच हजाराचे विमान तिकीट आता दहा ते १५ हजार रुपये झाले आहे. सोमवार ते बुधवारपर्यंतच्या तीन दिवसातील तिकीटाचे दर यापेक्षा अधिक आहे. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नसल्याने पर्यायी मार्गाने प्रवास करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. विमान कंपण्यांच्या ऑनलाइन बुकिंग वेबसाइट्सवर तिकिटांचे दर वाढले आहेत. प्रवासी संख्या वाढल्याने कंपन्यांनी ’डायनॅमिक प्राइसिंग’च्या नावाखाली मनमानी सुरू केली आहे. यात काही कंपण्यांनी मुंबई ते नागपूर दरम्यानचे दर १५ ते २० हजारांपर्यंत केले आहे.
दिवाळीतील गर्दीचा लाभ घेत खाजगी बसचालकांनी सुध्दा आपे भाडे वाढविले आहे. दिवाळीदरम्यानच्या मुंबई ते नागपूर, पुणे-नागपूर तसेच नाशिक, संभाजीनगर, सोलापूर कोल्हापूर, नांदेड मार्गावरील व्हॉल्वो आणि लक्झरी बसेसचे नेहमीपेक्षा हजार रुपयांनी वाढविले आहे. यामुळे दिवाळीत घरी जाण्यासाठी जादा पैसे मोजल्याशिवाय नागपुरात दिवाळीचा आनंद घेता येणार नाही.