गुरुनानक जयंतीनिमित्त मिरवणूक गुरुवारी

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
नागपूर,
guru-nanak-devs-birth-anniversary गुरुनानक देव जयंतीनिमित्त जरीपटका श्री कलगीधर सत्संग मंडळातर्फे गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मिरवणूक काढली जाणार आहे. शहरातील एक धार्मिक आकर्षण असलेली मिरवणूक मागील ५६ वर्षांपासून काढली जाते.
 
 
guru-nanak-devs-birth-anniversary
 
यंदा २३ ऑक्टोबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक सहभाग नोंदवितात. guru-nanak-devs-birth-anniversary संयोजक माधवदास ममतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मिरवणूकीत गुरू नानक देव, गुरू अंगददेव, गुरू अमरदास, रामदास, गुरू अर्जनदेव, गुरू हरगोबिंद, गुरू हरिराइ साहिब, गुरू हरक्रिशनदेव, गुरू तेगबहादूर, गुरू गोबिंदसिंघ, आदी शक्ती भवानी माता यांच्या चित्ररथांचा समावेश राहणार आहे. ही मिरवणूक जरीपटका तसेच हुडको कॉलनी, हाऊसिंग बोर्ड सोसायटी, आहुजानगर, कुशीनगर, अशोकनगर, कमाल टॉकीज रोड, कडबी चौक, कॉलनी, सुखजीवन कॉलनी, बैरामजी टाऊन, मेकोसाबाग इत्यादी मार्गाने भ्रमण आहे.