अंदमान एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी

17 Oct 2025 21:51:10
नागपूर,
liquor-smuggling-from-andaman-express गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकावर आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली असून रेल्वे स्थानकावर आणि गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांकडून बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
 
 
liquor-smuggling-from-andaman-express
 
दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तपासणी केली असता १६०३२ अंदमान एक्स्प्रेसमधून केल्या जाणार्‍या विदेशी बनावटीच्या तस्करी उधळून लावत साडेसात हजारांचा मद्यसाठा जप्त केला. liquor-smuggling-from-andaman-express मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली असताना आरपीएफने ही कारवाई केली. रेल्वे पोलिसांनी अंदमान एक्स्प्रेस नागपूरकडे येत असताना भरतवाडाजवळ आरपीएफ तसेच गुप्त वार्ता विभागाच्या जवानांनी गाडीची तपासणी सुरू केली. तेव्हा दारूची तस्करी उघड झाली.
 
 
Powered By Sangraha 9.0