संघ शाखेत शारिरिक मानसिक बौध्दीक शक्ती वाढते : जिल्हा प्रचारक समीर देशमुख

*बालस्वयंसेवकांचे पथसंचलन

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
बुलढाणा, 
district-campaigner-sameer-deshmukh राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या शाखेतून बाल मनावर राष्ट्र विचाराचे संस्कारासोबत शारिरिक, मानसिक बौध्दिक शक्ती वाढते. स्वातंत्र्यच्या चळवळीत देशभक्तीचे संघटन करण्यासोबत शिस्तबद्ध संस्कारक्षम नागरिक खेळाच्या माध्यमातून चांगले तरूण घडविण्यासाठी भारतमातेला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी पू. डॉ. हेडगेवार यांनी संघाची शाखा सुरु केली. त्यातूनच नविन पिढी घडविण्याचे कार्य सतत सुरु आहे. प्रत्येकाने शाखेत यावे असे आवाहन संघाचे जिल्हा प्रचारक समीर देशमुख यांनी केले.
 
 
district-campaigner-sameer-deshmukh
 
विजयादशमी निमित्त रा. स्व. संघ बाल व शिशू स्वयंसेवकांचे पथसंचलन व उत्सवाचे आयोजन फुलबाग बालकमंदीर केशव नगर येथे दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले होते. पथसंचलन घोषपथकासह काढण्यात आले. मार्गावर रांगोळी काढून पुष्प वर्षाव करीत स्वागत करण्यात आले.district-campaigner-sameer-deshmukh उत्सवाच्या व्यासपीठावर विभाग संघचालक चित्तरंजन राठी, प्रमुख पाहुणे फायनांशियल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर तुषार डोडिया, प्रमुख वक्ते जिल्हा प्रचारक समिर देशमुख, नगर सहकार्यवाह विवेक उबरहंडे होते.
 
प्रमुख वक्ते समीर देशमुख यांनी भारत मातेला विश्वगुरु बनविण्यासाठी समर्पित ध्येयाने संस्कार देण्याचे कार्य शाखेतून मी शिवाजी खेळाच्या माध्यमातून शिकविल्या जाते. त्याचे सर्व गुण बालमनावर निर्माण केल्या जातात. आजकाल मोबाईल वर गेम्स खेळल्यामुळे बालमनावर परिणाम होतो. चार भिंतीच्या आतील खेळांपेक्षा त्याऊलट शाखेतून मैदानी खेळ आत्मविश्वास वाढवितात. district-campaigner-sameer-deshmukh देशभक्तीचा भाव गितांच्या माध्यमातून निर्माण होतो. सुभाषित, गीत, अमृतवचनच्या वाचनातून चांगले नागरिक घडविण्याचे संघस्थावर कच्चा मातीला पक्के बनविण्याचे काम करण्यास येते. संघाच्या एक तासाच्या शाखेत एकत्र आले पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रमुख अतिथी तुषार डिडोया यांनी संघाच्या शाखेत बालमनावर राष्ट्र भक्तीचे संस्कारासोबत जीवन मुल्यांचे शिक्षण दिल्या जाते त्याचा अभिमान वाटतो लहान बालस्वयंसेवक शिस्तीने पथसंचलन योग प्रात्याक्षिक करतात हे पाहून त्यांचे कौतुक वाटते असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रारंभी भारतमाता व शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नियुद्ध प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. सुभाषित विराट तयाडे, अमृतवचन आनंद क्षीरसागर, वैयक्तीक गीत सुधनवा चाटोरीकर यांनी तर प्रास्ताविक परिचय नगर सहकार्यवाह विवेक उबरहंडे यांनी केले. उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.