जागेच्या वादातून खून करणाऱ्या बापलेकांना जन्मठेप

17 Oct 2025 18:28:38
अनिल कांबळे
नागपूर, 
Murder over land dispute : घराजवळील जागा हडपणाऱ्यांना हटकणाऱ्या व्यक्तीचा चाैघांनी तलवारीने भाेसकून खून केला. या हत्याकांडात बापलेकासह चाैघांना पाेलिसांनी आराेपी केले. न्यायालयान बापलेकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर दाेघांना पुराव्या अभावी निर्दाेष मुक्त केले. हा निर्णय जिल्हा सत्र न्यायाधीश जहीर अब्बास ए. शेख यांनी दिला. शेर खान उफर् बंटी नूर शेख (28 ), शेख नूर शेख प्यारू (50, दाेन्ही रा. भांडेप्लाॅट, सेवादल नगर, सक्करदरा ), अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आराेपींची नावे आहेत. तर आबेदा शेख शेख नूर (45) आणि फारूख शेख प्यारू शेख (42) अशी दाेषमुक्त झालेल्या आराेपींची नावे आहेत. हरीदास रामकृष्ण सावरकर (45, भांडेप्लाॅट) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव हाेते.
 
MURDER
 
फिर्यादी रंजना सावरकर (40) या पती हरिदास यांच्यासह भांडेप्लाॅट, सेवादल नगरात राहत हाेत्या. रंजना सावरकर आणि त्यांच्या घराशेजारी राहणारे आराेपी आबेदा शेख यांच्यात घराच्या बाजुला असलल्या जागेवरुन वाद सुरु हाेता. जागेवर अवैधरित्या कब्जा केल्याचा आराेप हरिदास सावरकर करीत हाेते. या कारणावरुन अनेकदा दाेघांमध्ये वाद सुरु हाेता. आराेपी शेरखान व शेख नूर तसेच आबेदा शेख व फारूख शेख यांनी 21 एप्रिल 2020 राेजी हरिदास यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना ठार केले. रंजना यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपींना 22 एप्रिल 2020 राेजी अटक केली हाेती. तत्कालीन सहाय्यक पाेलिस निरीक्षक धाेपावकर यांनी न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले हाेते. पाेलिसांनी चार आराेपींना अटक केली असून त्यापैकी दाेन आराेपी शेर खान व शेख नूर यांच्याविरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने न्यायधीश जहीर अब्बास यांनी भादंविच्या कलम 302 ,34 अन्वये जन्मठेप व दहा हजार रुपए दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा ठाेठावली. तसेच न्यायालयाने आबेदा व फारूख यांची निर्दाेष सुटका केली. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुरेंद्र राैराळे, शिल्पा इटनकर यांनी न्यायालयाला सहकार्य केले. सरकारर्ते अ‍ॅड. प्रशांत साखरे यांनी बाजू मांडली.
Powered By Sangraha 9.0