जमिनीचे भूसंपादन करताना योग्य मोबदला मिळावा

17 Oct 2025 12:44:01
नागपूर,
Land Acquisition : नागपूर शहराच्या सभोवताल तिसर्‍या रिंग रोड संदर्भात गुरुवारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)ने प्रकल्पासंदर्भात स्थानिक गावातील शेतकर्‍यांची रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात बैठक घेतली. यावेळी शेतकर्‍यांचे म्हणणे अधिकार्‍यांनी जाणून घेतले. यावेळी शेतकरी-नागरिकांनी जमिनीचे भूसंपादन करताना योग्य मोबदल्यासह पुनर्वसन व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
 
 
 
land
 
 
 
राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी प्रदाण केलेला शहरातील प्रस्तावित तिसरा रिंगरोड हा आउटर रिंगरोडला संपूर्ण वेळा घातलेला राहणार असून, सुमारे १४८ लांबीच्या आणि १२० मिटर रूंद या प्रस्तावित रस्त्यावर चार ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्लाझा उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागपूर हे मध्य भारताचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचे बोलल्या जात आहे.
 
 
तिसरा रिंग रोड जिल्ह्याच्या भोवताल असलेल्या सर्वच राष्ट्रीय, राज्य महामार्गावर जाण्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. याशिवाय या ९९ पेक्षा जास्त खेड्यांचे रस्ते थेट जुळणार आहे. यात सुमारे १७२० हेक्टर आर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. या बैठकीला एनएमआरडीए सभापती संजय मिना, अतिरिक्त आयुक्त सचिन ढोले यांच्या उपस्थित होते. बैठकीत अधिकार्‍यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करत, शेतकर्‍यांना प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले. सोबतच त्यांचेही म्हणणे जाणून घेतले. यावेळी शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी अधिग्रहण करताना योग्य मोबदल्यासह चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करावे. जमिनीसोबतच शेतात असलेल्या विहिर, झाडे आदींचा योग्य मोबदला मिळावा, संपर्कासाठी रस्त्यावर टोल फ्री क्रमांक असावा अशा विविध मागण्या केल्या.
 
 
शेतकर्‍यांच्या भावना समजून घेतल्या
 
 
आजची शेतकर्‍यांसोबत प्राथमिक बैठक होती. त्यामध्ये लोक आणि शेतकर्‍यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच प्रकल्पाचे महत्व एनएमआरडीएने दिले. चर्चेवेळी शेतकर्‍यांना योग्य कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देऊ.
सचिन ढोले, अतिरिक्त आयुक्त एनएमआरडीए.
Powered By Sangraha 9.0