नागपूर,
Mundle Hall मतिमंदांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संज्ञा संवर्धन संस्थेचा ३२ वा वार्षिकोत्सव नुकताच मुंडले सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रामकृष्ण मठ धंतोली येथील स्वामी गुणदानंद होते. अतिथी एस. बी. मिसरा यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत प्रगतीस शुभेच्छा दिल्या. स्वामी गुणदानंद यांनी विनम्रतेच्या सद्गुणाबाबत माहिती दिली आणि मानवसेवेचा संकल्प करण्याचे आव्हान उपस्थितांना केले. संस्थेचे सचिव डॉ. उत्तरवार यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला.

कल्पतरू शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी रसरंग जीवन या संकल्पनेवर आधारित नाटिका, नृत्य व देशभक्तीपर गाणी सादर केली. रामायण व महाभारतावर आधारित नाटिका, पारंपारिक वेशभूषेतील आकर्षक नृत्य, तसेच फ्युजन बँडच्या सादरीकरणाने प्रेक्षक व पालक मंत्रमुग्ध झाले. Mundle Hall या कार्यक्रमात १२३ पैकी ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सावजी व मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक अहवालाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावशाली संचालन संस्थेचे संचालक आलोक द्विवेदी यांनी केले. समारंभास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र