चांदूर बाजार/अचलपूर,
protests-in-chandur-bazaar शेतकर्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसने शुक्रवारी चांदूर बाजार व अचलपूर तहसीलसमोर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात शिदोरी आंदोलन केले. चांदूर बाजार तहसीलच्या आवारात तर चूल पेटवून तेथेच बेसन भाकरी बनविण्यात आल्या.
सरकारने शेतकर्यांसाठी जाहीर केलेली ३१,६२८ कोटींची मदत दिवाळीपूर्वी मिळेल, असे सांगितले होते; मात्र शेतकर्यांपर्यंत ही मदत अद्यापही पोहचली नाही. शेतकर्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात चांदूरबाजार तहसील कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काळी दिवाळी साजरी करून तहसील परिसरातच चुलीवर बेसन भाकरी करून शिदोरी आंदोलन करण्यात आले व तहसीलदार सोनल सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. protests-in-chandur-bazaar कार्यालय परिसरातच महिला व कार्यकर्त्यांनी चुलीवर बेसन, भाकर शिजवून आंदोलनातील शेतकर्यांनी शासनकर्ते तुपाशी अन् शेतकरी मात्र उपाशी असे नारे देऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच शेतकर्यांनी काळी दिवाळी साजरी केली. या आंदोलनात तालुका अध्यक्ष किशोर देशमुख, खविस अध्यक्ष डॉ. प्रताप किटुकले, बाबूभाई इनामदार, अरविंद लंगोटे, छोटू देशमुख आदी उपस्थित होते.
याचप्रमाणे अचलपूर तहसीलसमोरही शिदोरी आंदोलन बबलू देशमुख यांच्याच नेतृत्वात करण्यात आले. protests-in-chandur-bazaar या आंदोलनात महिला तालुका अध्यक्ष अश्विनी पेटकर, तालुका अध्यक्ष नामदेव तनपुरे, शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे, उपसभापती अमोल चिमोटे, देवेंद्र पेटकर, श्रीधर काळे, राहूल गाठे, अजीज पटेल, महेरुल्लाभाई, अहमदभाई, कदीर पेहलवान आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.