नपच्या मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस

*सहा नपमध्ये २ हजार २ आक्षेप

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
municipal-council-election जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी सर्कल प्रारुप, आरक्षण यासह अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मतदार यादीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे. मतदार यादीवर हरकती सादर करण्याची अंतिम तारीख १७ ऑटोबर होती. दुपारपर्यंत २ हजार २ हरकती नोंदविण्यात आल्या.
 
 
municipal-council-election
 
जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी आणि सिंदी रेल्वे या सहा नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात अनियमितता उघडकीस आली आहे. एका प्रभागातील मतदारांचा दुसर्‍या प्रभागातील यादीत समावेश करण्यात आला आहे. काही मतदार यादीतून गायब आहेत. मृत मतदारांची नावे यादीत समाविष्ट आहेत. निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर बीएलओ नियुत करण्यात आले. त्यांना प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आवश्यक होते. त्यानंतरच पात्र मतदारांची यादी तयार करता आली. तथापि, मतदार यादीतील अनियमितता पाहता मतदार यादी घरून तयार केल्याचा आरोप केला जात आहे. शोध घेतल्यानंतरही नवीन नोंदणीकृत मतदारांची नावे गायब आहेत. प्रारूप मतदार यादी जाहीर होताच मतदारांच्या चिंता वाढल्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आक्षेप आले. शुक्रवारी दुपारपर्यंत सहा नगरपरिषदांमध्ये २,०२० आक्षेप दाखल करण्यात आले होते. municipal-council-election सायंकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शयता वर्तवण्यात आली. इच्छुक उमेदवार न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीत लढणारे उमेदवार मतदार याद्यांची छाननी करत आहेत. तथापि, मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत आहेत. ज्यामुळे आक्षेप दाखल केले जात आहेत.
दुपारपर्यंत वर्धा नगरपरिषदेत २६६, हिंगणघाट ८३, आर्वी ३२८, पुलगाव ५७६, देवळी ८७ आणि सिंदी रेल्वे नगरपरिषदेत ६६२ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. दुरुस्त्यांनंतर अंतिम मतदार यादी ३१ तारखेला प्रकाशित केली जाईल. ७ नोव्हेंबर रोजी मतदार केंद्र आणि केंद्रनिहाय मतदार याद्या प्रकाशित केल्या जाणार आहेत.