समाजसेवेत योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा गौरव

17 Oct 2025 16:07:40
नागपूर,
Senior Citizens Council सीनियर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दीनानिमित्त सुरेश भट सभागृहात सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या वतीने शंभर ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. त्यांना सन्मानवस्त्र, सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले.
 
Senior Citizens Council
 
यानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय गार्डन येथील योग वर्गात देशमुख, फटिंग आणि बोराडे या तिन्ही सत्कारमूर्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. Senior Citizens Council माजी शिक्षण विस्तार अधिकारी भीमराव पाटील यांनी त्यांच्या लोकोपयोगी कार्याची माहिती देत त्यांना पुष्पगुच्छ प्रदान केला. सन्मानाबद्दल तिन्ही ज्येष्ठांनी आपले मनोगत व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम दुरगकर, पद्माकर आगरकर, गुलाब उमाठे आणि सुरेश धामणकर यांनी परिश्रम घेतले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य: श्रीराम दुरुगकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0