राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या वतीने काळी दिवाळी आंदोलन

17 Oct 2025 17:56:55
वाशीम, 
black-diwali-movement : शासनाने शेतकर्‍याची फसवणुक केली. अजुनही अतिवृष्टीची मदत शेतकर्‍यांच्या हाती आली नसल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने वाशीम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांच्या नेतृत्वात जिप माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, नप माजी उपाध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काळी दिवाळी आंदोलन छेडण्यात आले.
 
 
J
 
यावेळी जिल्हाधिकारी वाशीम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील महीन्यात झालेल्या अतिवृष्टींच्या संकटांनी व शासनाच्या फसव्या मदतीच्या सुलतानी संकटाने महाराष्ट्रातील शेतकरी बेजार आहेत. या नाकर्त्या सरकारने मदत जाहीर करून दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे खात्यात टाकू अशी आश्वाससन दिले. मात्र, अद्याप शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकर्‍याची दिवाळी अंधारात जाणार असून, याला सर्वस्वी जबाबदार महायुतीचे सरकार आहे. सरकारने निव्वळ आकड्यांची धुळफेक करून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. ऐन संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देणे गरजेचे असताना हे सरकार प्रचारात मग्न आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे वाशीम जिल्ह्याच्या वतीने सरकार विरोधात काळी दिवाळी आंदोलन छेडण्यात आले.
 
 
निवेदन देतांना जि.प.सदस्य अमीत पाटील खडसे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास खानझोडे, डॉ. नारायण शेंडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली मेश्राम, राकॉ तालुकाध्यक्ष रमेश पाटील गोटे, मनीष कानकिरड, काशीराम राठोड, राजेश पाटील टोपले, गजानन सरनाईक, भगवान शिंदे, रायुकाँचे रिसोड तालुका अध्यक्ष माधवराव शेवाळे, डॉ.गजानन बाजड, मुरलीधर जुनघरे, अनंता देशमुख, ईमरान फकीरावाले, शेषराव वाझूळकर, पं.स.चे माजी उपसभापती विजय घोडे, आसीफ पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते ह्या आंदोलनात सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0