व्हाईट केन डे निमित्त सीताबर्डी मेट्रो स्थानकावर दृष्टिबाधितांसाठी उपक्रम

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
नागपूर,
sitabardi-metro-station सोसायटी, नागपूर आणि महामेट्रो नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्हाईट केन डे सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाद्वारे दृष्टिबाधितांच्या गरजा, हक्क आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आत्मदीपम सोसायटीच्या अध्यक्ष जिज्ञासा चवलढाल यांनी आम्ही दृष्टिबाधितांसाठी केवळ संगणक शिक्षणच नव्हे, तर त्यांचा सर्वागीण विकास आणि संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
 

sitabardi-metro-station 
 
आतापर्यंत १४० हून अधिक दृष्टिबाधितांना शासकीय नोकर्‍या व अन्य क्षेत्रात रोजगार देण्यात यश आले आहे. याशिवाय अल्पदृष्टी व अंध मुलांनी केन डान्स सादर करत व्हाईट केन या त्यांच्या जीवनातील अनिवार्य भागाचे महत्त्व भावनिक पद्धतीने सादर केले. ट्रेनर अभिषेक शुक्ला यांनी मेट्रोमधील दृष्टिबाधितांसाठी सुविधा ब्रेल लिपीतील साईड बोर्ड्स, ऑडिओ अनाउन्समेंट्स, मदत केद्र इत्यादींची माहिती दिली. अश्विनी टेंभुर्णे यांनी लिफ्टजवळ बीपिंग कार्ड स्कॅनिंगसाठी व्हॉईस फीडबॅक, तसेच ऑडिओ गाइड्स या सुविधांवर भाष्य केले. मोबिलिटी इन्स्ट्रक्टर नीलेश भट आणि आदित्य चिमूरकर यांनी मेट्रो कर्मचार्‍यांसाठी गाईड टेक्निकचे प्रात्यक्षिक करून दृष्टिबाधितांना मदतीची पद्धत समजावून सांगितली. sitabardi-metro-station कार्यक्रमाच्या शेवटी, लाभार्थ्यांनी मेट्रोच्या विविध स्थानकांवरून आलेल्या सुमारे ४० मेट्रो कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले. उपक्रमाला महा मेट्रोतर्फे अखिलेश हळवे, गौरव शेंडे, योगेश्वर चवलढाल, जयंत गुळकरी आदी उपस्थित होते.