सिंहभूम,
jharkhand-gang-rape झारखंडमध्ये एक भयानक घटना उघडकीस आली आहे. तीन पुरूषांनी एका महिलेवर काळी जादू करण्याचा आरोप करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात एका ३० वर्षीय महिलेवर काळी जादू करण्याचा आरोप करत तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी तीन पुरूषांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, पीडित महिला ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील घाघरबेडा पोलिस स्टेशन परिसरातील एका गावातील ६० वर्षीय रहिवाशाची दुसरी पत्नी होती. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की ती तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. jharkhand-gang-rape जगन्नाथपूरचे एसडीपीओ राफेल मुर्मू यांनी सांगितले की ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली. घटनेची माहिती उशिरा समजलेल्या तिच्या पतीच्या जबाबावरून बुधवारी एफआयआर दाखल करण्यात आला. एसडीपीओंनी सांगितले की, गेल्या रविवारी, तिन्ही आरोपींनी तिच्या घरात बलात्कार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली.
तपासादरम्यान, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, बुधवारी महिलेचा मृतदेह सापडला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, आरोपीचा एक वर्षाचा मुलगा आजारी होता आणि त्याने महिलेवर चेटकीण असल्याचा आरोप केला. jharkhand-gang-rape १२ ऑक्टोबरच्या रात्री, मुलाचे वडील, त्याच्या दोन साथीदारांसह, पीडितेच्या घरात घुसले आणि हा गुन्हा केला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी मृतदेह एका धरणात नेला आणि दगडांनी झाकला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.