पंचवटी वृद्धाश्रमात स्वच्छता अभियान

18 Oct 2025 13:19:09
नागपूर,
Cleanliness campaign विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटी वृद्धाश्रम, उमरेड रोड येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठाशी संवाद साधून करण्यात आली.त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वृद्धाश्रम व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. प्लास्टिक, कचरा, पालापाचोळा यांचा वेगळा प्रकार करण्यात आला.
 
 
Women
 
वृद्धाश्रमातील विभाता आणि पुष्पा गायधने यांनी स्वयंसेविकांना वृद्धाश्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय सिंगनजुडे, डॉ. विजया राऊत आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक पवार यांनी केले. डॉ. रंजना व्यवहारे आणि प्रा. प्रणय दाते यांनी सहकार्य केले. Cleanliness campaign या भेटीचा उद्देश वृद्धाश्रमाची कार्यप्रणाली जाणून घेणे, वृद्धांशी संवाद साधणे, त्यांना स्नेहभाव देणे आणि विद्यार्थिनींना युवा भारत, स्वच्छ भारत या संदेशाचे महत्त्व समजावणे हा होता. या स्वच्छता अभियानात ५० स्वयंसेविका सहभागी होत्या.
सौजन्य: अमित तितारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0