धक्कादायक...पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये सापडला मेलेला उंदीर

18 Oct 2025 18:09:27
गोंदिया,
dead rat in nutrition packet एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीतील चिमुकल्यांना देण्यात येणाऱ्या व घरपोच वाटप होणार्‍या 'मल्टी मिक्स सिरीयल्स अ‍ॅण्ड प्रोटीन्स' या पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम धवलखेडी गावात उघडकीस आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

Swami Vivekananda College table tennis, Nagpur divisional school tournament, Gadchiroli sports news, table tennis runner-up, Anish Uke selected for state level, state table tennis selection, junior science college Gadchiroli, table tennis association Nagpur, Ashutosh Korde, Chandrahas Bhusari, Satish Chichghare statement, Sangeeta Atkamwar principal, consistent sports performance, student sports achievement, Maharashtra school sports, carrom state level players, Spadarshan Hajare, Nidhi Alam, school sports  
महिला व बालविकास प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांकरीता पोषण आहाराचा पॅकेट उपलब्ध करून देण्यात येते. दरम्यान, देवरी तालुक्यातील ककोडी बिटातील मिसपीर्री ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या धवलखेडी येथील अंगणवाडी केंद्रातर्फे ०६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहारचे पॅकेट वाटप करण्यात आले. दरम्यान, गावातील जमीन नरोटी या लाभार्थ्यालाही सदर पॅकेट देण्यात आले होते. त्यांनी घरी गेलेवर पाकीट उघडून बघितले असता, सदर पॅकमध्ये मृत उंदीर आढळून आले. बघता-बघता ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आदिवासींच्या मुलांशी शासन-प्रशासन थट्टा करत असल्याचा आरोप केला व संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या संदर्भात आदिवासी नेते व सामाजिक कार्यकर्ते मधुकर दिहारी यांनी जर अशा पद्धतीने आदिवासींच्या जीवाशी खेळ करत असाल तर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
 
घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः धवलखेडी येथे जाऊन पाहणी केली आहे. तसा पंचनामा तयार करून अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.
 
 
अनिल पटले
- एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, देवरी
Powered By Sangraha 9.0