नागपूर,
Dr. Manoj Pandey संशोधन तार्किक आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित करते व कोणतीही समस्या संशोधनाशिवाय सोडवणे अशक्य आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी तीन दिवसांच्या संशोधन कार्यशाळेत सांगितले. डॉ. पांडे यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले व सांगितले की शाश्वत विकासासाठी संशोधन अत्यावश्यक आहे. त्यांनी संशोधन संकल्पना, प्रबंध लेखनाच्या पद्धती आणि संशोधनाचे तत्वज्ञान स्पष्ट केले.
कार्यशाळेत सहाय्यक प्राध्यापक डॉ. लखेश्वर चंद्रवंशी यांनी "संशोधन- केव्हा, का आणि कसे?" आणि "संशोधन साहित्य: स्रोत, संग्रह व वर्गीकरण" या विषयांवर बोलताना संशोधनाची गरज, जिज्ञासा आणि विकासातील महत्त्व स्पष्ट केले. तसेच, डॉ. सुमित सिंह यांनी संशोधन विषय निवडीचे महत्त्व आणि त्याचा संपूर्ण संशोधन प्रक्रियेशी संबंध स्पष्ट केला. Dr. Manoj Pandey कार्यशाळेच्या समन्वयक प्राध्यापक जागृती सिंह यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि संशोधक या कार्यशाळेत उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. लखेश्वर चंद्रवंशी, संपर्क मित्र