वर्धा,
dhanteras-gold : अतिवृष्टी, नापिकीसह बाजारपेठेत पैसा नसल्याची ओरड सर्वत्र काल सायंकाळपर्यंत होती. आज धनत्रयोदशीचा दिवस उजाडला आणि बाजारपेठ उजळून निघाली. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी दुपारपासुन ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. दीड वर्षात सोन्याचे भाव नेट दुप्पट झाले. भावात अजून तेजी येणार आहे. आमचा व्यवसाय अपेक्षित समाधानकारक झाला असल्याची माहिती येथील एमटीडी ज्वेलर्सचे संचालक सौरभ ढोमणे यांनी दिली. आज १ लाख २७ हजार ७०० रुपये प्रति तोळा सोन्याचा भाव होता तर चांदी १ लाख ७० हजार रुपये किलो होती.

साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीला सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. सोन्याच्या दुकानात होत असलेली गर्दी आणि वेळेचे गणित साधत धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी अनेक जण सोने किंवा चांदीच्या दागिण्यांची आधीच बुकींग करून ठेवतात. फत मुहूर्त म्हणून आज दागिणे किंवा वस्तू घरी नेल्या जाते. साधारणत: सायंकाळी सोन्याच्या दुकानात गर्दी झालेली असते. यावर्षी दुपारपासुनच सोन्याच्या दुकानात गर्दी होती. सायंकाळी गर्दी कमी झाली. परंतु, रात्री अजून सोन्याच्या दागिण्यांची गर्दी वाढेल असा अंदाज ढोमणे यांनी व्यत केला.
२२ ऑटोबर २०२२ रोजी सोन्याचा दर ५० हजार ६०० रुपये होता. तो दर जानेवारी १५ जानेवारी २०२३ ला ५६ हजार ५०० रुपये झाला. २४ जानेवारी २०२३ ला ५७ हजार २०० रुपये दर झाला. तर २२ मार्च २०२४ ला ६६ हजार २०० रुपये दर होता. अवघ्या दीड वर्षात १७ ऑटोबर २०२५ ला हा दर जीएसटीसह १ लाख ३४ हजार ५१८ रुपये झाला. १८ ऑटोबर २०२४ पर्यंत सोन्याचा दर हा ७७ हजार २०० रुपये होता. बँकेचे व्याजदर कमी होतात. तेव्हा सोने खरेदीला महत्व दिले जाते. तसेच बाजारात असलेली अनिश्चितता व युद्ध तसेच अन्य कारणाने सोन्याच्या दरात सतत तेजी असून सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतात. पहिल्यादाच अवघ्या दीड वर्षात सोन्याचा दर हा दुप्पट झाल्याने सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. दिवाळीनंतर सोन्याचे भाव वाढतील, असा अंदाज ढोमणे यांनी व्यत केला.
धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी गर्दी होते. काही ग्राहक गुरुपुष्पामृत मुहूर्तावरही सोने खरेदी करतात. धनत्रयोदशीला नचुकता सोने खरेदी करणारेही ग्राहक असल्याचे त्यांनी सांगितले.