नागपूर,
Gajanan Nagar गजानन नगर येथे स्वर गंधार प्रस्तुत दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना विशाल देशपांडे यांची होती. कार्यक्रमात गायक कलाकार यामिनी पाईघन, डॉ. स्वप्नील नांदे आणि विशाल देशपांडे यांनी मराठी आणि हिंदी गाणी सादर केली. वादक राहूल मानेकर, कृणल दाहेकर आणि राजू ठाकूर यांनी संगीतात भर घातली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सेवलकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात उठी उठी गोपाला या गाण्याने झाली. त्यानंतर ज्योती कलश, राधा ही बावरी, मन उधाण या नाट्यगीतांसह काही लोकप्रिय हिंदी गाणी सादर करण्यात आली. Gajanan Nagar कार्यक्रमाची सांगता शुर आम्ही सरदार आणि माऊली माऊली या गाण्यांनी झाली. सर्व नागरिकांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य: सुधांशु दाणी, संपर्क मित्र