केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नातवंडांसोबत केली दिवाळीची खरेदी

18 Oct 2025 14:44:46
 
Gadkari shopping with grandchildren
 
नागपूर,
Gadkari shopping with grandchildren केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी यंदाची दिवाळी खास पद्धतीने आपल्या नातवंडांसोबत नागपुरातील स्थानिक बाजारात जाऊन फटाक्यांची खरेदी केली. साधेपणाने आणि कुटुंबासोबत वेळ घालवत गडकरींनी नागरिकांना ‘स्थानिक उत्पादने खरेदी करा आणि स्वदेशी उद्योगांना बळ द्या’ असा संदेश दिला.
 
 
Gadkari shopping with grandchildren
 
गडकरींनी नातवंडांसोबत हसत-खेळत फटाक्यांच्या दुकानात भेट दिली. त्यावेळी नागरिकांनी आणि लहान मुलांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली. गडकरींनी सर्वांना शुभेच्छा देत सांगितले की, “दिवाळी ही केवळ आनंदाची नव्हे तर सामाजिक जबाबदारीची सण आहे. पर्यावरणाचा विचार करून पर्यावरण पूरक फटाके वापरूया आणि देशी उत्पादकांना प्रोत्साहन देऊया. नागपूरकर नागरिकांनीही गडकरींच्या या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “ते नेहमी लोकांशी जोडलेले राहतात आणि आपल्या कृतीतून आदर्श निर्माण करतात.
Powered By Sangraha 9.0