धनत्रयोदशीसाठी खरेदीची सुवर्ण संधी...सोनं-चांदीचे दर घसरले

18 Oct 2025 11:10:40
नवी दिल्ली,
Gold and silver prices fell धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्ताच्या आगमनाने सोनं आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढत असताना, आज या दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोन्याचे दर तीन हजार रुपयांनी घसरून जीएसटीसह 1,32,000 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 1,78,000 रुपयांवरून 1,70,000 रुपयांपर्यंत आले असून आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.
 

Gold and silver prices fell 
 
गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता दिसत होती. विदेशी बाजारात सोन्याच्या दरात तेजी राहण्यामागे जागतिक भू-राजनैतिक तणाव, आशियातील मोठी मागणी आणि विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून सातत्यानं होणारी सोने खरेदी हे प्रमुख कारण आहेत. सध्याच्या बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस 4500 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अहवालानुसार, आतापर्यंत सोन्याला चांदीनं मागं टाकलं आहे, तर चांदीच्या दरात औद्योगिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळे तेजी आहे.
 
 
जागतिक अस्थिरता, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात आणि केंद्रीय बँकांकडून सोन्याचा साठा वाढवला जाणे यामुळे यंदा सोन्याचे दर 50 टक्क्यांहून अधिक वाढले असून 4000 अमेरिकन डॉलर्सच्या वर पोहोचले आहेत. भारतात सोन्याचे दर गेल्या आठवड्यात 1,20,000 रुपयांभोवती होते आणि येत्या काळात ते 1,35,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. तर चांदीच्या दरातही 60 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ते 2,30,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
Powered By Sangraha 9.0