गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक दिवाळीचे दिवे

*जीवरक्षक फॉउंडेशननेचा स्तुत्य उपक्रम

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट, 
eco-friendly-lamps : हिंदूधर्मात गाईला अतिशय पवित्र मानल्या गेलेले आहे. गाईपासून असंख्य फायदे असल्यामुळे तिला हिंदू धर्मशास्त्रात गो-माता म्हटल्या जाते. गाईच्या शेणामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो असे आपलं धर्मशास्त्र सांगतं. हे महत्त्व ओळखून येथील जीवरक्षक फॉउंडेशनने गाईच्या शेणापासून दिवाळीचे विविधरंगी दिवे तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केले. त्या दिव्यांना प्रचंड मागणी आहे.
 
 
dive
 
 
दिवाळी म्हटली की गो मातेच्या शेणाचे खूप महत्त्व आहे. दिवाळीत शेणाचा सडा असो वा पांडव पंचमीला अंगणात शेणाचे पाच पांडव पूर्वी हमखास असायचे. आता अंगणच हरवत चालल्याने या प्रथा आता इतिहासजमा होण्या पुरत्याच ऊरलेल्या आहेत. परंतु, जीवरक्षक फाउंडेशनने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. गो मातेच्या शेणापासून दिवे तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या दिव्याची विशेषत: म्हणजे हे दिवे पाण्यावर देखील तरंगतात. हे दिवे विक्रीसाठी ठेऊन यातून मिळणारे उत्पन्न जखमी मुया अनाथ गो-मातेला व इतर प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. दिवाळीत जास्तीत जास्त नागरिकांनी या गोमय दिव्यांचा उपयोग करावा व वन्य जीव रक्षक फॉउंडेशनला मदत करावी असे आवाहन जीवरक्षकचे राकेश झाडे यांनी केले आहे.