लोको पायलट संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

18 Oct 2025 11:48:47
नागपूर,
Loco Pilot Union Nagpur लोको आणि ट्रॅफिक रनिंग स्टाफच्या प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोको संघटनेच्या वतीने डीआरएम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. लोको पायलट अँड ट्रेन मॅनेजर लॉबी, प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या परिसरात धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने रनिंग स्टाफ सहभागी झाले होते. रनिंग स्टाफच्या ३० हून अधिक महत्त्वाच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
 

 Loco Pilot Union, Nagpur 
याप्रसंगी मध्य रेल्वे मजदूर संघाचे विभागीय वीरेंद्र सिंग, राकेश कुमार, बी.एस. तकसांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेश कुमार, धर्मेंद्र व्यास, मिलिंद पाठक, जी.के. पराते, पी.डी. पाटील, संजय जोशी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0