नागपूर,
Mauli Seva Mitra Mandal सामाजिक कार्यात हिरीरीने झोकून देणाऱ्या माऊली सेवा मित्र मंडळा तर्फे दिवाळीच्या निमित्ताने “दिवाळी मिलन” हा उपक्रम साजरा करण्यात आला. मंडळाचे सुहास खरे व त्यांची चमू विशेष म्हणजे तरुणांनाही लाजवेल अशा ऊर्जेने कार्य करणारे जेष्ठ नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले.
शहरातील नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीपेक्षा वेगळेपण जपत, मंडळाने केशोरी, कढोली आणि केळवद येथील मुलं, महिला आणि नागरिकांपर्यंत आनंद पोहोचविला. गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटविण्यात या सामाजिक उपक्रमाला यश आले. Mauli Seva Mitra Mandal या प्रसंगी शहरातील पोलीस बांधवांचे औक्षण करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सणासुदीच्या काळातही कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मनस्पर्शी प्रयत्न ठरला. मंडळाशी सतत नवे समाजाभिमुख लोक जोडले जात असून, संस्थेचे कार्य अधिक वृद्धिंगत होवो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सौजन्य:सुहास खरे,संपर्क मित्र