नागपूर,
Nagpur, Medical Hospital मेडिकल, अतिविशोषोपचार व मेयो रुग्णालयात दाखल रुग्णांना रोजच्या जेवणासह मिष्टान्न देण्यात येणार असून या रुग्णांचीही दिवाळी गोड होणार, हे विशेष.रुग्णालयात दाखल रुग्णांना मंगळवारी 21 ऑक्टोबरला मिठाई दिली जाईल. मेडिकल, ट्रामा सेंटर व अतिविशेषोपचार रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी दैनंदिन चहा, न्याहारी व भोजनाची प्रत्येकी दोनवेळची व्यवस्था करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरला एक विशेष मेनू असेल. मेडिकल रुग्णालयात दलिया हलवा हा गोड पदार्थ दिला जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.
सकाळच्या जेवणात व्हेज पुलाव, सोयाबीन-मटर मिक्स, चपाती, दाल-पालक, छोले, दाल-तडका, असा स्वादिष्ट मेनू ठेवण्यात आला आहे.मेयोतही गोड पदार्थ दिला जाणार आहे. या शासकीय रुग्णालयांमध्ये नागपूर ग्रामीणसह इतर शहरांतील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. रुग्णालयाच्या आहारात वरण, भात व भाजीचा समावेश असतो. हे एक सामान्य जेवण आहे. मात्र, दिवाळी पाहता रुग्णांना खास मेनू मिळणार असला तरी रुग्णांच्या आजाराचाही विचार केला जाणार आहे.