ना.ना सहकारी बँकेची अ‍ॅप सुविधा

18 Oct 2025 11:46:00
नागपूर,
NAGPUR NAGARIK SAHAKARI BANK LTD नागपूर नागरिक सहकारी बँक लि.ने धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मोबाईल बँकिंग अ‍ॅप सुविधेचा यशस्वी शुभारंभ केल्याची घोषणा करीत बँकेच्या डिजिटल प्रगतीच्या प्रवासातील एक नवीन मैलाचा दगड ठरला असल्याची भावना अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ‘विश्वसनीयता ही पुंजी’ हे ब्रिदवाक्य बँक साकारत असल्याचे अधोरेखित होते, असे ते म्हणाले.
 

NAGPUR NAGARIK SAHAKARI BANK LTD 
त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात मोबाईल बँकिंग अ‍ॅपमध्ये आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस, बँकेतील अंतर्गत व्यवहार, मिनी स्टेटमेंट, कर्ज माहिती, आरडी/एफडी माहिती, खाते स्टेटमेंट व कार्ड ब्लॉकिंग या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसèया टप्प्यात ग्राहकांना यूपीआय, चेक बुक विनंती, बीबीपीएस पेमेंट्स व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना विनाअडथळा व सोयीस्कर बँकिंगचा अनुभव मिळेल.
 
 
ना.ना. सहकारी बँक लि. या मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड याराज्यांत 45 शाखा आहेत. बँकेने आजवर हिंदू नागरी सहकारी बँक लि., नागरी सहकारी बँक लि. छिंदवाडा, नागरी सहकारी बँक लि. पांढुर्णा, महिला नागरी सहकारी बँक लि. सिवनी, व दादासाहेब रावळ सहकारी बँक लि. धुळे या पाच सहकारी बँकांचे विलिनीकरण करून ठेवीदार व कर्मचाèयांच्या हिताचे संरक्षण केले आहे. यात एकूण 16 शाखा समाविष्टझाल्या. पुढील सहा महिन्यांत मेहकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (जि. बुलढाणा), गणराज को-ऑपरेटिव्ह बँक (जि. बीड) यांंचे विलीनीकरण होणार आहे. याशिवाय मराठवाड्यातील आणखी एक 10 शाखा असलेली बँक विलिन होऊ घातली आहे.
 
 
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बँकेचा मिश्र व्यवसाय 2763 कोटी, वर्ष 2024-25 मध्ये 3046 कोटी असून सद्यस्थितीत बँकेचा एकत्रित व्यवसाय 3777.78 कोटी आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकेचा व्यवसाय साडेचार हजार कोटी होईल.कोणत्याही स्पॉन्सर बँकेशिवाय एटीएम, आरटीजीएस /एनईएफटी व ई - कुबेर सुविधा कार्यरत असलेली ना.ना.सहकारी बँक विदर्भातील पहिली सहकारी बँक आहे. बँक 70 लाखांपर्यंतची सुवर्ण तारण कर्जसुविधा केवळ 9 टक्के व्याजदराने उपलब्ध करून देते.
बँकेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
 
 
उपाध्यक्ष अशोक आर अग्रवाल, संचालक तुषारकांती डबले, गिरीश व्यास, डॉ. सुरेश चांडक, गौरव जाजू, रवींद्र बोकारे तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश एदलाबादकर, महाव्यवस्थापक श्रीकांत वानकर, मितेश डोबा, सुमंत जोशी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0