नागपूर,
South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे गत वर्षभरात विविध स्थानकांवर अस्वच्छता करणार्या ७ हजार १७७ प्रवाशांवर कारवाई करून ७ लाख ५४ हजार ५५५ रुपये दंड वसूल केला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे रेल्वे परिसर स्वच्छ ठेवणे तसेच प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत रेल्वे परिसर, प्लॅटफॉर्म तसेच गाड्यांमध्ये कचरा फेकणे, घाण किंवा परिसर अस्वच्छ करणार्या प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दपूम रेल्वे नागपूर विभागातील विविध स्थानकांवर एका वर्षात कारवाई करण्यात आली. यात ७ हजार १७७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली ७लाख ५४ हजार ५५५ रुपये दंड आकारण्यात आला. विशेष म्हणजे जून महिन्यात सर्वाधिक ८१३ प्रकरणांत ८२ हजार ८०० दंड वसूल करण्यात जुलै महिन्यात ६८९ प्रकरणांत ७१ हजार ८८०, मे महिन्यात ७४८ प्रकरणांत ७७ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आले. रेल्वे प्रशासनाने स्वच्छ, सुंदर आणि प्रवाशांसाठी आनंददायी परिसर निर्माण सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. प्रवाशांनी कचरा फक्त निर्धारित जागीच टाकावा आणि रेल्वेला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन दपूम रेल्वेचे दीपककुमार गुप्ता यांनी केले आहे.