आईआयटीमध्ये विद्यार्थ्यांचे नग्न करून काढले व्हीडिओ

18 Oct 2025 11:54:54
मुंबई,
Nude video in IIT मुंबईतील प्रतिष्ठित आयआयटी बॉम्बे (पवई) मध्ये विद्यार्थ्यांचे नग्न व्हिडिओ चित्रीत करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयआयटीमधील हॉस्टेल क्रमांक 14 मध्ये 12 ऑक्टोबर 2025 रोजी काही विद्यार्थ्यांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि सुरक्षा रक्षकांना तक्रार दिली. तपासादरम्यान, 32 वर्षीय राहुल पांडे, जो आयआयटीचा माजी विद्यार्थी आहे आणि 2025 मध्ये इलेक्ट्रिकल विभागातून एमटेक पूर्ण केला होता, त्याला विद्यार्थ्यांना शौचालय व अंघोळ करण्याच्या खोलीतून व्हिडिओ काढताना पकडले गेले.
 

Nude video in IIT
पोलिसांनी मोबाइल तपासल्यावर त्यात अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले, ज्यावर पवई पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. प्राथमिक माहितीच्या अनुसार, राहुल पांडे वसतीगृहात मित्रांना भेटण्यासाठी आला होता आणि कॅम्पस इंटरव्ह्यू प्रक्रियेसाठी येत होता. या प्रकरणात भारतीय दंडसंहिता आणि आयटी कायद्याच्या कलम 66(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आयआयटी बॉम्बेच्या प्रशासनाला देखील या प्रकाराची माहिती देण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याने संस्थेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
Powered By Sangraha 9.0