सेलू,
rss-hingani-branch : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणी शाखेचा विजयादशमी उत्सव गुरुवार १६ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वते म्हणून अमरावती विभाग शारीरिक प्रमुख सचिन मुळे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणी येथील डॉ. वल्लभ पनपलिया उपस्थित होते तर व्यासपिठावर सेलू तालुका कार्यवाह कृष्णा कावळे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देश भक्ती, शिस्त व सामाजिक बांधीलकीचे प्रेरणास्थान आहे. समाजातील प्रत्येक घटकाला संघकार्याशी जोडून राष्ट्रनिर्मितीची दिशा देण्याचे आवाहन यावेळी केले. प्रास्ताविक समीर शिरसागर यांनी केले आभार प्रफुल बावणे यांनी केले. उत्सवापूर्वी सायंकाळी ६ वाजता पथसंचलन काढण्यात आले.