अल्लीपूर,
Suresh Waghmare पक्षाने आपल्याला भरभरून दिलं. समाजही योग्य वेळी पाठीशी होता. राजकारणापलिकडे जाऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिताचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी श्री गणेश पेट्रोलपंपच्या वतीने १ लाख तर विठ्ठल-रुमिनी देवस्थानच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे एका कार्यक्रमात सुपुर्द केला. यावेळी विठ्ठल रुमिणी मंदिरचे विश्वस्त उपस्थित होते.मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिर कमेटीचे आभार मानले.